रत्नागिरी:- राज्याचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबद्दल शासनाची उदासिनता आहेच, पण नागरिक सुद्धा स्वच्छता राखत नाहीत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या394 व्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील जुनी तांबट आळी येथील शिवभक्तांनी सोमवारी सकाळी रत्नदुर्ग किल्ला गार्डन चकाचक केला. प्रत्यक्ष कार्यातून स्वच्छतेचा संदेश देत शिवभक्तांनी शिवरायांना अभिवादन केले…










