खेड(प्रतिनिधी) सलग सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या प्रचंड गर्दीसह धावत असून स्थानकात दाखल होणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश मिळवताना प्रवाशांची दमछाक होत आहे. त्यात विलंबाच्या प्रवासाची भर पडल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम आहे. सोमवारी ७ गाड्या विलंबाने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली.
दुरांतो एर्नाकुलम-एलटीटी एक्सप्रेस २ तास ५० मिनिटे तर कोच्युवेली एक्सप्रेस २ तास १० मिनिटे उशिराने रवाना झाली. सावंतवाडी-दिवा पॅसेंजर १ तास तर मंगला एक्सप्रेस १ तास ५० मिनिटे विलंबाने धावली.यापाठोपाठच मरुसागर एक्सप्रेससह कोच्युवेली- एलटीटी साप्ताहिक एक्सप्रेस १ तास उशिराने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.












