रोटरीच्या दोघी सी. ए. फाऊंडेशन परीक्षा उत्तीर्ण

 

खेड (प्रतिनिधी) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सी.ए. फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमधील वाणिज्य शाखेतील माजी विद्यार्थिंनी अमृता पवार,

नेहा पाटील सी. ए. फाऊंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

यशस्वी विद्यार्थिनींना वाणिज्य विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्था चेअरमन बिपीन पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दोघींचा सत्कार करण्यात आला.