सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, केंद्रीय मंत्री नारायण राणे राहणार उपस्थित
देवगड (प्रतिनिधी) देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. संपन्न होत आहे. अशी माहिती देवगड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अँड देवानंद गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देवगड वकील संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अँड अजित गोगटे, अँड अविनाश माणगावकर, अँड रुपेश राणे, अँड प्रकाश बोडस उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या.भुषण रा. गवई, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, भारत सरकार नारायण राणे, उपमुख्यमंत्री तथा विधि व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय ,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग रविंद्र चव्हाण, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर उपस्थित राहणार आहेत . यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग हेमंत गायकवाड उपस्थित राहणार आहेत
हा कार्यक्रम जुनी दिवाणी न्यायालय, देवगड इमारत परिसर, शासकीय गोडाऊन जवळ, पवनचक्की रोड, येथे संपन्न होणार आहे.
यानंतर मुख्य कार्यक्रम देवगड स्टॅन्ड समोरील न्यायालयाच्या इमारतीसमोर होईल
या कार्यक्रमाला समस्त जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन अँड देवानंद गोरे व देवगडच्या दिवाणी न्यायाधीश नंदा घाटगे यांनी केले आहे
यावेळी एडवोकेट आशिष लोके अँड सिद्धेश माणगावकर अँड प्रसाद करंदीकर, अँड लक्ष्मीकांत नाथगोसावी, अँड संगीता कालेकर, अँड मैथिली खोबरेकर व इतर वकील वर्ग उपस्थित होता












