‘स्वच्छ जल स्वच्छता मन परियोजने’ला उत्स्फुर्त प्रतिसाद
चिपळूण (वार्ताहर) : संत निरंकारी मिशन शाखा चिपळूण, तुरंबव आणि घोणसरेमार्फत प्रोजेक्ट अमृत अंतर्गत व चिपळूण नगर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजने अंतर्गत शहरातील पागमळा येथील शिवनदी व पागमळा ब्रीज परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून २५० साथ संगत सेवा दल व बाल सेवा दल यांनी २ हजार ८०० किलो कचऱ्याचे संकलन केले.
रविवारी सकाळी ८ ते १२ वाजता ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी चिपळूण नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधिक्षक अनंत मोरे, वरिष्ठ लिपिक राजेंद्र जाधव, आरोग्यर निरीक्षक महेश जाधव, प्रसाद साडविलकर, वलिद वांगडे, दत्ताराम लोलम, रवीकांत सातपुते व संत निरंकारी मिशनचे सर्व सभासद व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी चिपळूण नगर पालिका कार्यक्षेत्रातील नद्या व आजुबाजूचा परिसर स्वच्छ केला. संत निरंकारी मिशनचे २५० साथ संगत सेवादल व बाल सेवा दल यांनी सक्रीय भाग घेऊन नदी स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी बावशेवाडी येथील शिक्षक विलास कांबळे, प्रदीप कांबळे व रहिवासी संत निरंकारी मिशनचे साथ संगत सेवा दल, बाल सेवा दलाचे पुष्पु गुच्छ देऊन विशेष आभार मानले. यावेळी संकलित केलेला २८०० किलो कचरा नगर पालिकेच्या शिवाजी नगर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रामध्ये पाठविणेत आला. सर्व संत निरंकारी मिशनच्या सभासद महिला व गुरु बंधूचे पालिकेच्यावतीने आभार मानले.











