खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील वेरळ येथील पीर हजरत जलालशहा बाबा दर्गा यांचा उरूस २९ रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दर्ग्याचे संदल शरीफ पै. हाजी एम. आय. पोत्रिक यांच्या निवासस्थानावरून हजरत दादापीर सय्यद जैगुल आबीदिन साहेब कादिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी ३ वाजता निघणार आहे. रात्री ९ वाजता संदल शरीफ मजार शरीफवर चढविण्यात येईल. सर्व भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अब्दुल कादीर महंमद इसहाक पोत्रिक यांनी केले आहे.








