तळगाव खाडी किनारी तीन अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त ; मालवण महसूल पथकाची कारवाई 

अमित खोत | मालवण : कर्ली खाडीपात्रात तळगाव खांदवाडी पेडवेवाडी किनारी अनधिकृत वाळू उतखन्न व वाहतूकसाठी उभारलेले 3 वाळू रॅम्प मालवण महसूल पथकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. तहसीलदार वर्षा झालेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुकळवाड, तलाठी तळगाव, कोतवाल तळगाव पथकाने ही कारवाई केली आहे. यापुढेही अनधिकृत वाळू उतखंनन वाहतूक विरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.