ओटवणे | प्रतिनीधी : सप तनाथ देवस्थान म्हणजे सरमळे दाणोली मार्गावर गर्द हिरव्या वनराईत असणार अपूर्ण अवस्थेतील पांडवकालीन मंदीर.मात्र कित्येक वर्षांची जिर्णोद्धाराची प्रतीक्षा अखेर संपली असून येत्या ५मार्च ला एका रात्रीत हे मंदीर ग्रामस्थ उभारणार आहेत . पांडवकालीन असणाऱ्या या मंदिराचा इतिहासही गौरवशाली आहे. या मंदिराच्या अवती भवती पांडवकालीन खुणा आढळतात त्यामुळे इथ पांडवांचा वास होता याचा इतिहास साक्ष देतो.या ठिकाणी वस्ती केल्यानंतर हे मंदीर पांडवांनी एका रात्रीत उभे करण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले मात्र उजाडताच ते इथून निघून गेले हा इतिहासही सांगण्यात येतो आणि तशा इतिहासाच्या खुणाही या भागात पहायला मिळतात . या मंदिरात शिवलिंग , पींडी आणि पुरातन मुर्त्या आहेत दरवर्षी याठिकाणी शिवरात्री ला उत्सव असतो ज्यावेळी इथ साधी बसण्याची ही व्यवस्था नव्हती तिथं अथक मेहनतिने ग्रमस्थानी सुसज्ज जागा तयार केली.

त्यामुळे अनेक कार्यक्रमही पार पडतात.रस्त्याच्या एका बाजूला तेरेखोल नदीचं सुंदर पात्र तर रस्त्याला लागून दुसऱ्या बाजूला सपतनाथाच देवस्थान त्यामुळें हा परीसर मनात साठवण्यासारखा आहे. दिवसा,रात्री अपरात्री कधीही या मार्गातून जाणाऱ्या वाहन चालकांचे पाय इथ थांबतात आणि या ठिकाणी भाविक नतमस्तक होतात. हाकेला धावणारा चुकलेल्याला मार्ग दाखविणारा रक्षणकर्ता सपतनाथ अशी या देवाची ख्याती आहे. शिवरात्री दिनी या ठिकाणीं सरमळे भगवती देवीची पालखी ही या ठिकाणी भेटीसाठी वाजत गाजत आणली जाते.मात्र अपूर्णा अवस्थेतील हे मंदिर नेहमीच भाविकांना पूर्ण व्हाव अस वाटायचं आणि या मंदिराचा जिर्णोद्धार करावा अशी मागणी वर्षानुवर्षे भाविक ग्रामस्थांमधून होत होती पण मंदिराचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी देवीच्या कौलाची गरज होती.
त्यासाठी कौल घेण्यात आला.भाविकांच्या मनातील इच्छे ला देविनेही होकाराचा कौल दिला.एका रात्रीत हे मंदीर उभारण्याच दिव्य ग्रामस्थानी मनी बाळगल आणि तारीख ही ठरविली.शिवरात्री येण्या अगोदर 5 मार्च रोजी रात्री हे मंदिर बांधण्याचं ठरवलं हा सुवर्ण क्षण पाहण्याच भाग्य या दिव्यत्वाचे साक्षीदार आणि या मंदिराच्या योगदानात सहभागी होण्याचं भाग्य भाविकांनी लाभणार असून यात सहभागी व्हावं आपल योगदान द्यावं असही आवाहन ग्रामस्थ मानकरी यांसकडून कऱण्यात आले आहे.











