खेडमध्ये रिक्षा थेट उतरली गटारात

 

खेड (प्रतिनिधी) खेड तहसील कार्यालयनजीकच्या गटारात रिक्षा अचानक उतरल्याने एकच खळबळ उडाली. रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर रिक्षा बाहेर काढण्यात यश आल्याने रिक्षाचालकाने सुटकेचा निःश्वास टाकला. सुदैवाने कोणालाही दुखापती झालेल्या नाहीत.

खेड तहसील कार्यालयात दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची सतत गर्दी असते. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सर्रासपणे वाहने उभी केली जात असल्याने तहसीलदार कार्यालयाचे आवार पार्किंगस्थळ बनले आहे. दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांव्यतिरिक्तही अन्य नागरिकही वाहने उभी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्याने वाहनचालकांना वाहने उभी करायची तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एक रिक्षाचालक तहसीलदार कार्यालयासमोरून जात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट गटारातच उतरली.