मालवण शहर प्रभाग 4 मधील विविध विकासकामांना मंजुरी

माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून कामे मंजूर 

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद भाजपा माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांनी मालवण शहर प्रभाग 4 मधील विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे. त्याबद्दल गणेश कुशे यांनी आभार मानले आहेत.

 

मंजूर कामांमध्ये प्रताप मंत्री घर ते बंधारा मार्गांवर गटार बांधणे व त्यावर लाद्या टाकून रस्ता रुंद करणे. नंदू देसाई घर ते राजकोट बंधारा गटार बांधून त्यावर लाद्या टाकून रस्ता रुंद करणे, तसेच बंधाऱ्यावर पाइप टाकून गटाराचे पाणी समुद्रात सोडणे. ओवणेकर घर ते ग्रामीण रुग्णालय गटार बांधणे. ओटवणेकर घर ते साधले तिठा आणि तिथून देसाई हायस्कूल पर्यंत गटार बांधणे. ही कामे मंजूर केली असून त्याची निविदा देखील निघालेली आहे. माजी नगरसेवक गणेश कुशे व भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या माध्यमातून या सर्व कामांचा पाठपुरावा केला होता. अशी माहिती देण्यात आली.