Malvan | फोरव्हीलर थेट घरावर धडकली ; भिंती कोसळल्या ; मोठे नुकसान

शनिवारी पहाटे कोळंब येथे घडला अपघात

मालवण | प्रतिनिधी : मालवण आचरा हमरस्त्यावरील कोळंब येथे शनिवारी पहाटे मोठा अपघात घडला. एक फोरव्हीलर रस्त्या लगत असलेल्या घरावर धडकली. यात घराच्या भिंती कोसळल्या आहेत. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. गाडीचीही मोठे नुकसान झाले.

कोळंब मधलीवाडी येथे राहणारे दिनकर बाळकृष्ण डिचोलकर पत्नी व मुलगा हे कुटुंब झोपेत असताना मालवणच्या दिशेने येणारी फोर व्हीलर पहाटे ३ वाजता घरावर धडकली. मोठा आवाज झाला. घराच्या दर्शनी भागाच्या भिंती कोसळल्या. डीचोलकर कुटुंब व शेजारी घराबाहेर आले.

अपघातग्रस्त कार मधून चालक बाहेर आले. भोगवे येथून रेवंडी येथे जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात होते.