सावंतवाडी : सावंतवाडी उभाबाजार रघुनाथ मार्केट येथील श्री देव महापुरुष समादेवी मंदिराचा कलशारोहण सोहळा गुरुवार ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून या निमित्त ३ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ६ मार्चला सायंकाळी ४ वाजता कलश मिरवणूक होणार असून श्री देव दैवज्ञ गणपती मंदिर येथून विठ्ठल मंदिर, जयप्रकाश चौक, गांधी चौक, उभा बाजार हनुमान मंदिर, रघुनाथ मार्केट व श्री देव महापुरुष समादेवी मंदिरापर्यंत ही कलश मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.
तर गुरुवार ७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता ‘धार्मिक विधी व कलशारोहण ‘ त्यानंतर दुपारी २ वाजता महाप्रसाद व रात्री ८ वाजता श्री देव हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. शुक्रवार ८ मार्च रोजी सकाळी ९ वाचता लघुरुद्र, सायंकाळी ५ वाजता सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम तर रात्री ८ वाजता ‘भव्य जिल्हास्तरीय खुली सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव महापुरुष, समादेवी मंदिर रघुनाथ मार्केट मित्रमंडळ उभाबाजार यांच्यावतीने करण्यात आले आहे.










