इ स्टोअर विरोधात देवगड मधील मनसेना आक्रमक

दि. १४/२/२४ रोजी दिलेल्या निवेदनानुसार आज दी.०५/०३/२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि ई स्टोअर ईंडीया कडून फसवणूक झालेल्या सुमारे शंभरहुन अधिक महीलांनी देवगड पोलिस ठाणे गाठून फसवणूकीस कारण असलेल्या एजंटां विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही भूमिका घेत जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही ईथून जाणार नाही अशा प्रकारची भुमिका घेतली असता.म.न.सेने या पुर्वी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन सदर प्रकरण आर्थिक गुन्हा शाखेजवळ वर्ग केलेले असुन त्या संदर्भात मी पूर्ण माहीती घेतो.कुणकेश्वर यात्रेनिमित्त पोलिस प्रशासन व्यस्त असल्या कारणाने दि.१२/०३/२४ पर्यत आम्हाला वेळ द्या.त्या नंतर आपल्या मागणी नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करुन योग्य ती कडक कारवाई केली जाईल अशा प्रकारचे आश्वासन देवगडचे पोलिस निरीक्षक मान.श्री अरुण देवकर यांनी उपस्थितांना दिले.पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देउन आजचे हे आंदोलन तुर्तास मागे घेत आहोत.परंतु प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यपद्धतिने न्याय मिळवून देऊ अशा प्रकारचा ईशारा म.न.से.तालुकाध्यक्ष श्री.संतोष मयेकर यांनी इ स्टोअर ईंडीया च्या एजंटाना दिला आहे. आजच्या या आंदोलनाचे नेतृत्व महीला तालुकाध्यक्षा सौ.स्वरा करगुटकर आणि उप तालुकाध्यक्षा सौ.स्वाती सावंत यांनी केले.

या प्रसंगी शंभरहुन अधिक महीलांसमवेत म.न.वि.से.उपजिल्हाध्यक्ष श्री.अनिकेत तर्फे, शहराध्यक्ष श्री.सचिन राणे, तळवडे शाखाध्यक्ष श्री.सिद्धार्थ जाधव,श्री.प्रविण मयेकर,श्री.बबलु परब,सौ.परी देवळेकर,सौ.संचिता घाडी,सौ.राजश्री लाड,सौ.चैतन्या तारकर,सौ.वृषाली टेंबुलकर,सौ.रोहीणी चव्हाण,सौ.दामिनि गांवकर,सानिका बावकर इ.महीला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.