हर्षली दशावतार सृष्टी.. पप्पू नांदोस्कर आगमनाने 

खानोलीच्या रंगमंचा वरून पप्पू नांदोस्कर पुनश्च एकदा रंगभूमीवर ..

प्रा. वैभव खानोलकर l खानोली

नुसत्या वाचनाने माणूस लौकिक प्राप्त होत नाही.

वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडून अभिनय करायचे असतात म्हणजे भुमिका चिरंजीव होतात.

करमणूक करताना स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक रसिक मनात भिनत नाही आणि लौकिकाच्या शिखरावर विराजमान हि होता येत नाही

शंभर जणांत एकटे लक्षात राहायचे असेल तर त्या शंभरपेक्षा काही तरी वेगळे करायचे असते.आणि हा वेगळेपणा पप्पू नांदोस्कर यांनी सातत्याने दाखवला आणि म्हणूनच कमी कालावधीत ते खलनायक असुनही लोकप्रिय ठरले.

आपल्या बावन्न कशी अभिनयाने रसिक मनाचा वेध घेणारे दशावतारातील ज्ञानसुर्य म्हणजे पप्पु नादोसकर

प्रतिभा ही एखाद्या विजेच्या लाेळासारखी असते, तिला धरू जाणारे शंभरातील नव्याण्णव हाेरपळून मात्र घेतात. एखाद्याच्या हाती ही वीज गवसते.’ ती गवसली ती पप्पू नांदोस्कर यांना

अन् काय चमत्कार दशावतार वैविध्यपूर्ण माहिती समोर येऊ लागली, संयुक्त नाटकाच्या माध्यमातून स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत पप्पू नांदोस्कर हे दशावतारातील नवे ब्रॅड ठरले.

दर्जेदार भाषा , कोटी करण्याची किमया ,करारी नजर ,खांदे उडवत लंगार नाचण्याची पध्दत पण अचूक आहे लयबद्ध पद्न्यास स्पष्ट आणि स्वच्छ शब्दोच्चार आणि भुमिका कोणतीही असो प्रत्येक भुमिकेला त्यांनी दिलेल्या न्यायामुळेच दशावतार दीड दमडी समजला इंद्र हि सर्व श्रेष्ठ ठरला तर जटायू हि केवळ एका प्रवेशाची भुमिका करून दबदबा निर्माण करता येतो हे त्यांनी दाखवले तर दक्ष करताना तो उन्मत्तपणाची अहंकाराची परिसिमा त्यांनी गाठत हि भुमिकेने सर्वोच्च शिखर गाठले.

पितामह भिष्म साकारताना ती सात्विकता, ज्ञानाचा परिपाक त्याच्यात, सहजपणे दिसला आणि भिष्म सुध्दा रसिकांच्या सोबतच परिक्षकांच्या मनात घर करून बसला.

भुमिका कधीच करायची नसते तर ती जगायची असतं हे दशावताऱ लोककलावंताचे जुनं तत्वज्ञान पप्पू नांदोस्कर यांनी व्रतं म्हणून स्विकारले़ आणि आपल्या भुमिकेची दहशत निर्माण केली.

संयुक्त नाटकाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग ज्ञानाचा,माहितीचा पाऊस बरसवला अर्थात या ज्ञानाचा पाऊस बरसवण्यात अजुन काही कलावंताची नावे आहेत जी आपल्याला टाळता येणार आणि विसरून हि चालणार नाहीत पण या सर्व ज्ञानयज्ञात विशेष योगदान होते ते पप्पू नांदोस्कर यांचे .

शंभर कौरवांची नावे एका दमात सांगणे, इंद्र सभेची लांबी रुंदी असेल, स्वर्गाची नावे असतील अशा अनेक गोष्टी पप्पू नांदोस्कर यांनी रसिकांना आपल्या भुमिकेच्या माध्यमातून सांगितल्या.

“पौराणिक भाषा” हि फक्त भाषा नाही तर तो ज्ञानाचा अथांग स्रोत आहे जसे शब्द हे

संस्कृतीचे वाहक असतात तसे कलावंत हि संस्कृती चे संवर्धक असतात. माणसांचे जगणे समृद्ध करण्यात लोककला माध्यम फार मोठे काम करते मात्र हि जाणिव फारच कमी कलावंतांना असते

पप्पू नांदोस्कर यांनी मात्र हे जाणले आणि बेभान पणे त्या नी रंग देवतांची सेवा केली.

दशावताराच्या ज्ञान कक्षा रुंदावत असताना अनपेक्षित प्रसंग घडला

मुंबईतुन नाट्य प्रयोग करून घरी परतताना 06 ऑगस्ट 2022 रोजी त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आणि अनेकांच्या हदय सिंहासनावर विराजमान असणाऱ्या या नटश्रेष्ठाच्या हृदयावर 17ऑगस्ट 2022 ला सर्जरी करावी लागली

अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं, प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता वेगवेगळ्या देवाला नवस गाऱ्हाणी,इथली जनता घालत होती .

संकटे येतात ती उध्वस्त करण्या साठी नाहीत तर ती खंबीरपणे उभे राहाण्या साठी , सक्षम बनविण्यासाठी अगदी तसेच घडलं आजार शरीराला होतो मनाला पप्पू नांदोस्कर शरीराने आजारी होते पण मनाने खंबीर त्यांच्यातील कलावंत जागरूक होता रंगमंचावरून बाजूला गेलेलं नांदोस्कर मात्र आपल्या व्यासगांतुन रंगमंचावर नाविन्यपूर्ण नाट्य प्रयोग देत होते याचा एक कलाविष्कार म्हणजे खानोलकर दशावतार मंडळाचा ट्रिक सिन नाटक हर्षली अयोध्या नगरी .

केवळ नाटकं देऊन ते शांत बसले नाहीत अनेकांना या वेळी त्यांनी घरी मार्गदर्शन केले काही शालेय मुलांना रंगभुषा, वेशभूषा करून अभिनयाचे धडे देत अनेक स्पर्धेत यश मिळवुन दिले, थांबतील ते पप्पू नांदोस्कर कसले..?

त्यांचा प्रवास तसाच झंझावाती राहिला.

पराभव कधीच रणांगणात होत नसतो तर मनात होतो पण ज्याचे मन खंबीर असतं त्याला आकाश ही व्यापता येत अगदी तसेच अनेकांच्या सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वाद घेत पुनश्च एकदा नटश्रेष्ठ पप्पू नांदोस्कर खानोली मध्ये दांडेकर उत्सव निमित्त आयोजित नाट्य प्रयोगात पुनरागमन करणार आणि पुनश्च हि दशावतार रंगभूमी हर्षीत होणार …ती पप्पू नांदोस्कर याच्या आगमनाने…

तिचं तिचं गुळगुळीत वाक्य, कालबाह्य झालेले तेच तेच संवाद आता परत नाविन्याने सजतील आणि अनेकांना आनंद मिळेल..

कवितेच्या भाषेत सांगायचे झाल्यास

 

असे जगावे दुनियेमध्ये,

आव्हानाचे लावुन अत्तर,

नजर रोखुनी नजरे मध्ये,

आयुष्याला द्यावे उत्तर..

 

नको गुलामी नक्षत्रांची,

भीती आंधळी ताऱ्यांची,

आयुष्याला भिडतानाही,

चैन करावी स्वप्नांची..

असे दांडगी इच्छा ज्याची,

मार्ग तयाला मिळती सत्तर,

नजर रोखुनी नजरे मध्ये,

आयुष्याला द्यावे उत्तर..

 

 

शब्दांकन -प्रा.वैभव खानोलकर

लोककला अभ्यासक, सिंधुदुर्ग