कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार आणि कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार न्यानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कणकवली विधान सभा मधील ७५ माध्यमिक शाळेंना इ लर्निंग किट वाटप कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या हस्ते कणकवली प्रहार भवन कार्यालयात करण्यात आले. यावेळी सर्व शाळेतील शिक्षक व संस्थाचालक उपस्तिथ होते.
या साहित्यामध्ये स्क्रीन, स्पीकर, माइक, प्रोजेक्टर, माउस, मेटल स्टैंड, बॅग, पेनड्राइव यामध्ये ५ वी ते १० वी चे सर्व सिलाबर्स मोफत आहेत. त्यामुळे उपस्थित शाळेतील शिक्षकांनी आमदार नितेश राणे व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आभार मानले यावेळी यावेळी दिलीप तळेकर, संजय नकाशे, कलमठ सरपंच तथा युवा अध्यक्ष संदीप मेस्त्री, संदीप साटम, अमोल तेली, बंड्या मांजरेकर, वामन तर्फे याच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.












