खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील कात्रण येथील सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. भडवळकर गुरूजी यांच्या तर्फे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज करिता ध्वनिक्षेपक यंत्रणा भेट दिली. या मध्ये दोन स्पिकर, दोन स्टॅंड, माईक व केबल यांचा समावेश आहे. यावेळी प्रशाला समितीचे सदस्य संजय बुटाला, मुख्याध्यापक रोहित भोळे , उपमुख्याध्यापक श्री. हुलगे, पर्यवेक्षक उत्तम कांबळे व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या देणगी साठी ज्युनियर कॉलेज मधील प्रा. बाळकृष्ण बाईत यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.











