सावंतवाडी । प्रतिनिधी : युवाशक्ती ही भारताची खरी ताकद असून जगभरात आज भारत हा युवकांचा देश म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या युवकांच्या उन्नतीसाठी नेहमीच अग्रेसर राहिला असून या पदांच्या माध्यमातून तुम्हीही त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ व बांदा मंडल अध्यक्ष सिद्धेश कांबळी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक अध्यक्ष महेश सारंग, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, प्रवीण देसाई त्यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











