विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची आमदार नितेश राणे यांनी केली चौकशी

 

 

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथे जवाहर नवोदय विद्यालयात अन्नातून झालेल्या विषबाधेची भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. विषबाधा होण्यामागची कारणे ही विचार विचारून घेतली.

अशा प्रकारच्या घटना घडू नये याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला योग्य ती समाज द्यावी असे सांगितले.विद्यार्थांची प्रकृती जपावी ,त्यांना आवश्यक ते सर्व उपचार द्यावेत. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचे काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी बोलताना दिला आहे.