जबलपूर-कोईमतूरला २८ जूनपर्यंत मुदतवाढ

 

खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जबलपूर-कोईमतूर सुपरफास्ट साप्ताहिक फेस्टीव्हल, स्पेशलला २८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. स्पेशलचे पावसाळी वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.

०२१९८/०२१९७ क्रमांकाची जबलपूर-कोईमतूर सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. यामुळे सद्यस्थितीत धावणाऱ्या स्पेशलला ५ एप्रिलपासून मुदतवाढ देण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. २४ डब्यांच्या स्पेशलला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, खेड,
चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा आदी स्थानकात थांबे आहेत. एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक पोरबंदर-कोच्युवेली साप्ताहिक अतिरिक्त डबा वाढवण्यात आला आहे.