आमदार नितेश राणे यांनी देवूतो शब्द पूर्ण करू ची दिली प्रचिती
पंचक्रोशी होणार जलसंपन्न;पाणीटंचाई कायमची संपणार,
कणकवली :भिरवंडे गांधीनगर येथे धरणाचे भूमिपूजन कणकवली देवगड विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. देवूतो शब्द पूर्ण करू ही प्रचिती यानिमित्ताने गांधीनगर येथील जनतेला आला आहे.
या भुमिपून समयी माजी जी. प.अध्यक्ष श्री.संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जी.प. अध्यक्ष सौ.संजना सावंत,सरपंच श्री.मंगेश बोभाटे, शिवसेना उजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत,उपसरपंच श्री.राजेंद्र सावंत, माजी सभापती श्री.सुरेश सावंत, दादा सावंत,आबा सावंत,रमेश सावंत,संतोष सावंत,कांता सावंत,सुनील सावंत,राजा सापळे,गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदेश सावंत यांनी सांगितले की भाजप पक्ष्यात एक वर्षापूर्वी मी शब्द दिला होता की विकासाची गंगा माननीय आमदार श्री.राणे साहेब यांच्या माध्यमातून आणणार,आणि इतर कामे मी आणली आणि या वर्षातले मोठे काम म्हणजे ९५ कोटींचे धरणाचे अधिकृत भूमिपूजन केले आहे.नुसत्या वल्गना केल्या नाही.नंतर आमदार साहेबांनी या गवसाठी धरण आणण्यासाठी कसा पाठपुरावा करून,याच महिन्यात वर्क ऑर्डर आणून आज भूमिपूजन करून दीलेल्याशब्दाला राणे फॅमिली जगतात हे सांगितले,याही पुढे अनेक कामे मी करीन हे आश्वासन दिले.यावेळी श्री.अशोक कांबळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.












