ग्लोबल रक्तविरांगना मालवण आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

महिमा मोहिते, लिना धुरी, स्नेहल ढोके, चंद्रकला सातपुते, वैशाली प्रभूझाटये, विजया कांदळगांवकर विजेते

अमित खोत | मालवण : चला धावूया रक्तदान जनजगृतीसाठी…., चला धावूया प्लास्टिक मुक्तीसाठी…, चला सखी धावूया स्वतःच्या आरोग्यासाठी… अश्या स्वरूपात सामाजिक जनजागृती करत ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने रविवार 10 मार्च सकाळी मालवण सागरी महामार्ग देऊळवाडा ते कोळंब पूल या दरम्यान आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धेस मुली व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जेष्ठ स्पर्धकांचा सहभाग स्पर्धेला चैतन्य देणारा ठरला.

स्पर्धेतील विविध गटात महिमा मोहिते, लीना धुरी, स्नेहल ढोके, चंद्रकला सातपुते, वैशाली प्रभूझाटये, विजया कांदळगांवकर यांनी विजेतेपद पटकावले. दुसऱ्या वर्षी आयोजित या स्पर्धेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे आयोजन व नियोजन आदर्शवत असेच ठरेले.

सहा गटात ही मॅरेथॉन स्पर्धा झाली त्यातील विजेते. यात पहिला गट 10 ते 15 (वय) विजेते महिमा मोहिते, पूर्वा बांदकर, हर्षाली वेंगुर्लेकर, कावेरी परब, लिशा चव्हाण. दुसरा गट 15 ते 25 (वय) लिना धुरी, मेघा सातपुते, रेश्मा पांढरे, श्रुती चव्हाण, दिक्षा झोरे. तिसरा गट 26 ते 35 (वय) स्नेहल ढोके, सोनाली पेडणेकर, श्रेया मांजरेकर, नवेली चव्हाण, पद्मिनी मयेकर. चौथा गट 36 ते 45 (वय) चंद्रकला सातपुते, शर्वरी पाटील, रुपाली चव्हाण, निलम मयेकर, वर्षा सांबरी. या सर्व गटात 2 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा झाली. तर पाचवा गट 46 ते 55 (वय) चालणे (मिनी वॉक) वैशाली प्रभूझाटये, रसिका तळाशीलकर, पेरपेट फर्नांडिस, संजीवनी कुडाळकर, संजना आंबेरकर. सहावा गट 56 वर्ष पुढील चालणे (मिनी वॉक) विजया कांदळगांवकर, अनुष्का कदम, सुनीता जाधव, अस्मिता रावराणे, अनिता आळवे. 2 किलोमीटर मार्गांवर संपन्न झालेल्या या स्पर्धेतील या विजेत्यांना चषक, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच सहभागी सर्व सुमारे 250 स्पर्धकांना मेडल व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

नुकत्याच साजरा झालेल्या महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक व्यक्तीमत्व सौं. जयश्री हडकर, सौ. अनिता आळवे, सौं. रजनी चव्हाण, कु. तेजस्विता परब यांचा उल्लेखनीय कार्यासाठी झुंजार राणरागिणी पुरस्कार देऊन सत्कार सन्मान करण्यात आला. सचिन आचरेकर यांच्या संकल्पनेतून जेष्ठ महिला स्पर्धक संगीता हळदणकर यांच्या यांचाही सन्मान तसेच योगज्योती योगा ग्रुप, प्रयोजक तसेच लकी ड्रॉ मधील विजेते यांचाही सन्मान करण्यात आला.

स्पर्धेचे उदघाटन जेष्ठ महिला संगीता हळदणकर, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी राधा केरकर, समृध्दी धुरी, नेहा कोळंबकर, पल्लवी खानोलकर, अनुष्का चव्हाण, वैशाली शंकरदास, सुविधा तिनईकर, कविता वेंगुर्लेकर, शिल्पा खोत, रूपा बिडये, स्नेहा जामसंडेकर, गौरी सावंत, निलम मयेकर, पूजा तळाशिलकर, अंजली आचरेकर, गौरवी पराडकर, सोनाली पाटकर, राणी तायशेटये, विजय पांचाळ, राजा शंकरदास, अंकुश कातवणकर, गणेश कोळंबकर, सहदेव साळगावकर, अमेय देसाई, उत्तम पेडणेकर, राजू बिडये, ललित चव्हाण, मयु पारकर, विकास पांचाळ, रेनोल्ड भुतेलो, संदीप पेडणेकर, बंटी केरकर, मंदार ओरसकर, अमेय झाटये निशिकांत पराडकर, अविनाश मांजरेकर अमित वेंगुर्लेकर, हनु हडकर स्पर्धेचे सूत्रसंचालक क्रीडा शिक्षक अजय शिंदे सर यांसह आयोजक टीम सदस्य उपस्थित होते. माजी क्रीडा शिक्षक गंगाराम आडकर यांनी स्पर्धक व उपस्थित यांना मोफत स्वरूपात उसरस वितरित केला. तसेच मालवण ग्रामीण रुग्णालय व मालवण पोलीस प्रशासन यांचेही स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. असे सांगत आयोजकांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.