वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ला कॅम्प येथील कातकरी व रस्ता कामगार वस्तीमध्ये वेंगुर्ला लिनेस क्लबच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ३० लहान मुले, २८ स्रीया, १० पुरुषांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्राथमिक औषधे मोफत उपलब्ध करून दिली.
यावेळी डॉ. रघुनाथ कामत यांनी रुग्ण तपासणी केली व औषधे मिळवून देण्यासाठी बहुमोल मदत केली. डॉ. हर्षदा देवधर यांनी महिलांची तपासणी केली तसेच महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, लहान मुलांची व स्वतःची स्वच्छता कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती दिली. आपला वेळ लिनेस क्लबच्या आरोग्य शिबीराला दिला. डॉ . महेंद्र सावंत यांनी पण आरोग्य तपासणी साठी आपला वेळ देऊन लिनेस क्लबला सहकार्य केले. वस्तीवरील सर्वांना खाऊ वाटप ही करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुषमा प्रभू खानोलकर, लिनेस क्लबच्या सेक्रेटरी पल्लवी कामत, लिनेस हेमा गावस्कर, लिनेस निला यरनाळकर, लिनेस मंदाकिनी सामंत, लिनेस बिना भाटीया आदी उपस्थित होत्या.