केशवराव भोसले यांना पुत्रशोक

 

 

खेड(प्रतिनिधी): मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते केशवराव भोसले यांचे ज्येष्ठ सुपुत्र राजेश केशवराव भोसले (४९) यांचे बुधवारी सकाळी १० वा. अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले.

 

त्यांच्यावर मुंबई येथील स्मशानभूमीत सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.