संगमेश्वर : प्रतिवर्षाप्रमाणे श्री जुगादेवी धनीण मातेचा शिमगा उत्सव फाल्गुन पौर्णिमा रविवार दिनांक २४/०३/२०२४ पासून सुरू होत आहे . त्यामध्ये रविवार 24/03/2024 रोजी दुपारी ०२:०० नंतर देवळात जाणे पालखीला रूपे लावणे . संध्याकाळी ०६:०० पालखी सहाणेवर आणणे, संध्याकाळी ०६:३० होळी तोडण्यासाठी जाणे व होळी सहाणेवर आणून ठेवणे. रात्री ८:३० नंतर जेवणासाठी घरी जाणे ; सहाणेवर पालखी दर्शन / जत्रा रात्री ११:०० होळी उभी करणे त्यानंतर पालखी नाचवणे.
25/03/2024 सोमवारी रोजी पहाटे ०४:०० नंतर होम, सकाळी ०९:०० नंतर गाऱ्हाणी बैठक, दुपारी ०३:३० महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, मंगळवार 26/03/2024 दुपारी ३:०० नंतर खुणा काढणे, संध्याकाळी श्री सत्यनारायण महापूजा, रात्री ०७:०० आरती, रात्री ०८:०० महाप्रसाद, रात्री १०:३० नंतर चोरवणे येथील सुप्रसिद्ध पारंपरिक नमन खेळे कार्यक्रम.
बुधवार पासून पालखी घरे घेणे सुरुवात. पालखी गावात फिरणे वेळापत्रक गाऱ्हाणी बैठक मध्ये ठरेल त्यानुसार जाहीर केले जाईल याची नोंद घ्यावी. तरी सर्व ग्रामस्थ व भाविक भक्तगणांनी आवर्जून उपस्थित राहून उत्सवात सहभागी व्हावे. असे आवाहन गावप्रमुख , गावकार व मानकरी मंडळी श्री जुगादेवी शिमगोत्सव कमिटी, चोरवणे , तालुका संगमेश्वर यांनी केले आहे.












