गुहागर | प्रतिनिधी
तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी व पेवे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीचा शिमगोत्सव सध्या मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दोन दोन बहिणींचा पालखी भेट सोहळा उद्या शुक्रवारी तळवली ग्रामदेवता सहाण येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.यावेळी प्रथमच या पालखी भेट सोहळ्याचे युट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.त्यामुळे नोकरीनिमित बाहेरगावी असणाऱ्या भक्तगणांना हा पालखी भेट सोहळा प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
या दोन बहिणींची भेट प्रसिद्ध असून यावेळी दोन्ही पालख्यामधील नारळाची अदलाबदल होते अशी आख्यायिका पूर्वजांकडून सांगितली जाते.यावर्षी देखील मोठ्या उत्साही वातावरणात नियोजनबद्ध हा पालखी भेट सोहळा पार पडणार आहे. या अनोख्या पालखी भेट सोहळ्यासाठी विविध ठिकाणाहून भाविक उपस्थित असतात.यावेळी तळवली गावाला जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.या पालखी भेट सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सुकाई देवी देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.












