परुळे : प्रतिनिधी : जिल्हा परिषद महीचा बाल विकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. याचे वाटप आज परुळे बाजार येथे पोषण आहार “पंधरवडा च्या कार्यक्रमा निमित्ताने करण्यात आले. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, पर्यवेक्षका शर्मिष्ठा सामंत, ग्रामसेवक शरद शिंदे, माजी सरपंच प्राजक्ता चिपकर, आरोग्य सेवीका आर.आर. पिंगूळकर, आरोग्यसेवक एस. आर चव्हाण आदींसह परुळे बीटच्या सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
यावेळी पोषण आहार पखवाडा निमिताने टाकाऊ पासून टिकाऊवस्तू तयार करून त्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी अतिशय कलात्मक पदधतीने टाकाऊ पासून वस्तू तयार करण्यात आल्या. यात अंगणवाडी सेविकांबरोबरच पालकांनी ही सहभाग घेतला होता. यावेळी आदर्श पर्यवेक्षीका पुरस्कार प्राप्त शर्मिष्ठा सामंत, अंगणवाडी सेविका ऋतुजा राऊळ, मदतनीस राजश्री परुळेकर यांचा आदर्श पुस्कार 2023/24 मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. तालुक्यातील अन्य बीटवर ही आज अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले.











