
अमित खोत | मालवण : ढोल ताशांचा गजरात… मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख निलेशजी राणे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने उत्स्फूर्त स्वागत मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हजारोच्या संख्येने आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, सहकारी मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी ही यावेळी करण्यात आली. विविध ठिकाणाहून आलेल्या तरुण, जेष्ठ, महिला आदीनी शुभेच्छांचा वर्षाव निलेश राणे यांच्यावर केला.












