बोरघर नजीक महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अल्टोची धडक

 

अल्टोमधील दोघे गंभीर जखमी,

खेड (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर बोरघर या ठिकाणी महामार्गावर अतिवेगाने धावणाऱ्या गाड्यांवरती नजर ठेवणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या महामार्ग लगत उभ्या असलेल्या स्पीड गन व्हॅनला गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, अल्टो कार महामार्गावर उलटली या अपघातात अल्टो कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

अल्टो कारमधील परेश वसंत साबळे (वय ४२, रा. पोलादपूर) व अक्षय यशवंत मोरे (वय १९, रा. पोलादपूर) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही कळंबणी आणि उपजिल्हा रुग्णालयात .
उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील अक्षय वसंत मोरे याला गंभीर दुखापत झाल्यामुळे अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातात महामार्ग पोलिसांच्या स्पीडगन व्हॅनचे मोठे नुकसान झाले