सिंधुनगरी | प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक आचारसहिता सुरू झाली असून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस दलाची जबाबदारी आणखी वाढली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाचे संचलन सुरू झाले आहे. सिंधुनगरी पोलीस ठाणे हद्दीत रविवारी सायंकाळी पोलिसांचा रूट मार्च झाला. अशी माहिती सिंधुनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी दिली.
दरम्यान, रविवारी सायंकाळी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत कसाल बाजारपेठ व सिंधुदुर्गनगरी परीसर असा Root March काढण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनीष कोरटकर यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च झाला. सोबत पोऊनि कदम, रापोउनि श्री तोमर व सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे कडील 5 अंमलदार, 11 होमगार्ड व पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडील 2 RCP प्लाटून असे एकूण 4 अधिकारी, 65 अंमलदार, 5 वाहने असे लाठी, हेल्मेटसह रूट मार्च काढण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला आरसीपी प्लाटून, होमगार्ड्स पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बळ देण्यात आले असून जिल्ह्यातील कायदा आणि व्यवस्था सुरळीत राहावी, व निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस दल सतर्क झाले आहे. जिल्ह्यात ठीक ठिकाणी पोलीस दलाचे संचलन सुरू करण्यात आले आहे.











