भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहत असतानाच तिकडे जागतिक राजकारणातील मोठी उलथापालथ झाली असून रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. पुढील सहा वर्षाच्या अध्यक्षीय कारकिर्दीसाठी ही निवडणूक झाली.
या निवडणुकीत पुतीन यांना तब्बल 87 टक्के मते मिळाले आहेत.
रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी पुतीन यांनी जोरदार तयारी केली होती. अर्थात त्यांच्यासमोर प्रतिस्पर्ध्याचे कोणतेही तगडे आव्हान नव्हते, कारण त्यांचे जे प्रतिस्पर्धी ताकदवान होते, त्यापैकी बहुतांश परदेशात पळून गेले आहेत, अथवा जे आहेत त्यांना तुरुंगवास भोगावा लागत आहे, त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ॲलेक्स नवल्नी यांचा गूढ मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये पुतीन यांनी हा विजय मिळवला आहे.
पुतीन गेली 25 वर्ष रशियाच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत आणि अजूनही ते सहा वर्ष कार्यरत राहतील. दरम्यान पुतीन यांच्या हुकूमशाही वृत्ती विरोधात रशियातील लोकांनी जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची आंदोलने चिरडलु गेली. दुसरीकडे रशियातील या निवडणुकीसंदर्भात युरोपीय देशांनीही टीका केली आहे.












