शेतकर्‍यांना उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रोत्साहन देणार !

Google search engine
Google search engine

तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर

कुडाळ ( प्रतिनिधी )

कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा विकास करणे हाच राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रमुख उद्देश आहे. ज्यासाठी कृषी व्यवसाय उद्योजकतेला चालना दिली जाईल. या योजनेतून कृषी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.ज्याद्वारे दर्जेदार बियाणे साठवणुक, बाजारपेठ सुविधा इत्यादींमध्ये प्रवेश सुनिश्चित केला जाईल. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार योजना तयार करण्यात येणार आहे. याशिवाय या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. ही योजना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी प्रभावी ठरेल. याशिवाय या योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल. असे प्रतिपादन कुडाळ तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर यांनी झाराप येथे शेती शाळेत केले.

राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत भात शेती व गुणवत्ता सुधार प्रकल्प, आणि अंतराष्ट्रीय पोष्टिक तृण धान्य वर्ष ,शेतकरी प्रशिक्षण, जागृती कार्येक्रम झाराप येथे आज प्रगतशिल शेतकरी शरद धुरी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती घाटकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सरपंच दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश गांवकर, ग्रामपंचायत सदस्य संजीवनी पेंडूरकर, अनंत मयेकर, अग्रिकार्ट फ़ार्म प्रोड्यूसर कंपनी चे सचिन चोरगे, प्रगतशील शेतकरी बाजीराव झेंडे, विष्णु तामाणेकर, किर्लोस कृषि विज्ञान केंद्र चे डॉक्टर विलास सावंत, मंडळ कृषी अधिकारी अमोल करंदीकर, जयश्री तेली, साईनाथ तांबोळी,कृषि सह्याक गीता परब, उपस्थित होते.राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत चे सर्व गटा चे शेतकरी उपस्थित होते. योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये,अंमलबजावणी या विषयी घाटकर यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर विलास सावंत यांनी शेतीतिल देशी ग़ायी चे महत्व,सेंद्रिय शेती, पाणी साठवण या विषयी मार्गदर्शन केले. ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे सचिन चोरगे यांनी स्थानिक जैवविविधता, बियाणे संकलन, बियाणे बैंक, पिक वाण,बिजोत्पादन,सेंद्रिय निविष्टा उत्पादन, प्रशिक्षण या विषयी मार्गदर्शन केले.शेतीत यंत्रिकीकरण चे महत्व, याबाबत विष्णु तामणेकर ,आणि शरद धुरी यांनी मार्गदर्शन केले. कार्येक्रमा चे सूत्र संचालन अमोल करंदीकर यांनी केले. यावेळी प्रगतशील शेतकरी शरद धुरी यांचा कृषि विभागा ने सत्कार केला. गटातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत येणाऱ्या समस्या निवारण बाबत मार्गदर्शन घेतले.शरद धुरी यांच्या शेतात यंत्राद्वारे भात लावणी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविन्यात आले.आभार अमोल करंदीकर यांनी मानले.