देवधे व्हाया चांदेराई जाणाऱ्या रस्त्यावर नग्न अवस्थेत सापडलेल्या अज्ञात तरुणाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू

रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील देवधे व्हाया चांदेराई जाणाऱ्या रस्त्यावर सापडून आलेल्या अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 22 मार्च रोजी सायंकाळी 5.55 वा. जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
शुक्रवारी दुपारी तेथील नागरिकांना एक अज्ञात तरुण नग्न अवस्थेत देवधे व्हाया चांदेराई जाणाऱ्या रस्त्यावर उमरे क्रेशरजवळ पडलेला दिसून आला. त्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.