महाळुंगे गावातील यूवकाचे अपहरण

पुणे चाकण : –आदित्य युवराज भांगरे (वय -18 वर्षे )याचे अपहरण करण्यात आले आहे.आदित्य हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या आईने पोलिसांत दिली आहे .महाळुंगे गावातील शंभू भोसले या मुलासोबत आदित्य याची मैत्री होती.शंभू भोसले व त्याच्या साथीदारांनी गावातील रितेश संजय पवार याचा खून काही महिन्यापूर्वी केला होता.

मृत रितेश पवार याचा भाऊ राहुल संजय पवार हा शंभू भोसले व त्याच्या मित्रांना सोडणार नाही त्यांचा बदला घेणार असे म्हणत होता.रितेशच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आदित्यचे अपहरण ता.16 ला करण्यात आले आहे.

असे फिर्यादित म्हंटले आहे.या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे. आदित्यचे अपहरण ज्या आरोपींनी केले ते आरोपी रितेश पवार याचा भाऊ व इतर आहेत.

महाळुंगे येथे रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचा भाऊ राहुल पवार याने त्याच्या खुनाचा बदला घेण्याची भाषा केली होती. दरम्यान खरपुडी गावच्या हद्दीत एकाचा खून करून त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार रासे फाट्याजवळील हॉटेलात एकावर गोळीबार केलेल्या चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका आरोपींने कथन केला आहे.

त्यामुळे महाळुंगे येथील प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहे. त्यानंतर अपहरण झालेल्या तरुणाचे नेमके काय झाले त्याला डांबून ठेवले आहे का? व इतर काही प्रकार घडला आहे का याची उकल होणार आहे त्यासाठी पोलीस तपास करत आहेत.