अवघ्या तेरा मिनिटात कशेडी बोगदा पार

बोगद्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर
लाखो चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात
खेड (प्रतिनिधी)
कोकणात शिमगोस्तवाची धूम सुरू झाली आहे. लाखो चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. शनिवारी पहाटेपासून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची रिघ लागली आहे. अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय असणान्या आणि रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या बोगद्यातून कोकणात जाणारे लाखो चाकरमानी प्रवास करीत आहेत. अवघ्या चौदा मिनिटात कशेडी घाट बोगद्यातून पार होत आहे.
बोगद्यातील नऊ मिनिटांचा प्रवास सुखावणारा आहे. अत्यंत सुरक्षित आणि कमी वेळेत कशेडी पाटाला पर्याय असणारे बोगद्यातून चाकरमानी आपल्या गावी जात आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतून .शिमगोस्तवात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला खुली केली आहे. दरवर्षी कशेडी घाटातून हजारोंच्या संख्येने वाहने येतात. त्यामुळे अपघातदेखिल होतात. तसेच पोलादपूरपासून कशेडी घाट उतरेपर्यंत एक ते दीड तास जातो. मात्र यावर्षी कशाडी बोगद्याचे स्वप्न काहीअंशी पूर्ण झाले असून कशेडी घाटातील एक लेन म्हणजेच एक मार्गिका कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुली झाली आहे.परिणामी शनिवारी मध्यरात्रीपासून हजारो वाहने या बोगद्यातून प्रवास करू लागल्याने  प्रवाशांच्या अवघ्या काही मिनिटात आपला प्रवास कमी वेळेत करीत पार होत आहे