मांद्रे पोलिसांकडून १४ लाखांचा चरस जप्त

पेडणे | निवृत्ती शिरोडकर : मांद्रे पोलिसांनी मांद्रे – गावडेवाडा येथे मोहम्मद निहाल (२९, रा.केरळ) या युवकाकडून चरस आणि एलसीडी पेपर अशा प्रकारचा एकूण १४ लाख ३६ हजार ३०० रुपयाचा मादक ड्रग्स जप्त केला.

मांद्रे पोलीस निरीक्षक शेरीफ जाकीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नागरिक बेकायदेशीरपणे स्वतःकडे ड्रग्स ठेवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक कुणाल नाईक, पोलीस साईशा पोकले, विजय गायकवाड, बाबाजी पेडणेकर, राजेश शिरगावकर आदी पोलिसांची टीम तयार करण्यात आली. सदर टीमने सापळा रचून संशयिताकडून १४ लाखांचा चरस जप्त केला. संशयिता विरुद्ध मादक ड्रग्स विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.