हेत येथे १ एप्रिल ला “कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज” लोकनाट्याचे आयोजन 

९८ व्या नाट्य संमेलनात या नाटकाचा झाला होता गौरव

वैभववाडी l प्रतिनिधी :     हेत होळीचा मांड येथे शिमगोत्सव निमित्त सोमवार दि. १ एप्रिल रोजी “कोकणचा साज संगमेश्वरी बाज” या धमाल विनोदी लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वर्गीय उद्योजक श्री. रवींद्रनाथ गुरव यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री. रुपेश गुरव आणि गुरव परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. हे लोकनाट्य संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेले असून, या नाट्याला

९८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात गौरविण्यात आले आहे.

या लोकनाट्याचा हेत मध्ये होणारा ४२० वा प्रयोग आहे.

सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हेत गावचे मेळेकरी, मानकरी आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.