दहिवली रामवाडी , गावठाण वाडी येथील प्रवाशांना मिळाली प्रवासी निवारा शेड

खेड(प्रतिनिधी) दहिवली रामवाडी चे सुपुत्र श्रीराम सेल्स एजन्सी चे मालक युवा उद्योजक म्हणून  असलेले श्री विश्वास दादा कदम यांनी आपल्या जीवनाची  पन्नास वर्षे पूर्ण केली . त्यानिमित्ताने आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ रामवाडी येथील प्रवाशांना एसटी ची वाट बघत उन्हामध्ये थांबावे लागत होते यासाठी या प्रवाशांसाठी एसटी बस थांबा आहे त्या ठिकाणी एक निवारा शेड उभारून देण्याचा संकल्प केला होता तो पूर्ण केला. या  शेडचं उद्घाटन  २५  मार्च  रोजी गावातील वाडीतील वरिष्ठ मंडळींच्या हस्ते करण्यात आले अशी माहिती जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर चे संस्थापक अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांनी दिली आहे.