पत्रकारासह बैठकीत ग्रामसेवक व सरपंच निरुत्तर
आचारसंहिता संपल्यावर तक्रारदारांकडून ग्रा.पं समोर उपोषणाचा निर्धार !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : ग्रामपंचायतीसमोरील सुशोभीकरण आणि सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेला गडगा,जुन्या धर्मशाळेची मोडतोड करून केलेले अधिग्रहण — ह्या साऱ्या गोष्टी जमीन एन. ए.न करता लाखो रुपयांचा निधी वापरून बांधलेली अनधिकृत ग्रामपंचायत वास्तू आणि दुसऱ्याच्याच सर्वे नंबर मध्ये नदीच्या शेरवी पात्रात बांधण्यात आलेली बेकायदेशीर संरक्षक भिंत आणि अन अनेक अनुत्तरीत प्रश्न ? याकरिता तक्रारदार समीर सामंत यांनी ग्रामसेवक विलास कोलते, सरपंच संजना आग्रे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सावंत आणि पत्रकार यांचे उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी प्रशासनाचा, पर्यायाने जनतेच्या लाखो रुपयांचा निधीचा अपव्य बिनदिकत, हुकूमशाही आणि मनमानी पद्धतीने ठराविक ५/६ स्थानिक ठेकेदार,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्या संगनमताने बिनबोभाट सुरू आहे. या सर्व प्रकाराला पाठीशी घालणारे संबंधित खात्याचे अभियंता,प्रांताधिकारी आणि तत्सम अधिकारी यांच्यामुळे याबाबत गेल्या पाच- सहा वर्षाची प्रशासकीय चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई होऊन,जनतेला सत्य कळावे अशी मागणी यावेळी समीर सामंत यांनी करताना, या भ्रष्टाचाराचे दस्तऐवजच सादर करून भ्रष्टाचाराची पोलखोल केली..
मुळात ग्रामपंचायतीची जमीन एन . ए.केलेली नसताना अथवा संबंधित सक्षम अधिकाऱ्याची परवानगी नसताना, लाखो रुपयांचा निधी खर्च ,(याबाबत तपशील दिला नाही) रस्त्यामध्ये गडगा- सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च ,त्यासाठीची टेंडर नोटीस नगण्य वृत्तपत्रात प्रसिद्ध करून, स्थानिक ५/६ ठेकेदारांकडून कामाची बोगस पुर्तता, नदीपात्रातील झाडे तोडून ग्रा. प .लगतच्या कब्जेदारांच्या सर्वे नंबर मध्ये संरक्षक भिंतीसाठी लाखो रुपयांचा खर्च,मात्र यावेळी गावातील शेतकऱ्यांसाठी चार-पाच वर्षे मागणी करूनही संरक्षक भिंतीच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, याबाबत प्रांत अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल देण्यास सांगितलेला असताना त्यासाठी दिशाभूल करणारी उत्तरे, काम थांबवण्याचे आदेश असताना ठेकेदाराला बिल अदा करणेबाबत चे पत्र, याची कोणतीही समर्पक उत्तरे ग्रामसेवक देऊ शकले नाहीत. त्याला प्रांताधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे
अधिकाऱ्यांचेही आशीर्वाद असल्याचे पत्रव्यवहारतून स्पष्ट होत होते.
याबाबत शेवटचा उपाय म्हणून समीर सामंत यांनी आचारसंहिता संपल्यावर ग्रामपंचायत समोर उपोषणास बसण्याचा निर्धार या बैठकीमध्ये व्यक्त केला. सरपंच अथवा ग्रामसेवक या बैठकीमध्ये उपस्थित कोणत्याही प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊ न शकल्याचे ने भ्रष्टाचाराच्या संशयाला पुष्टी मिळत आहे. सरपंचांनी हे सर्व प्रस्ताव मागील ग्रामपंचायत कार्यकाळात असल्याचे सांगितले. त्यामुळे या सर्व प्रकाराची न्यायालयीन अथवा प्रशासकीय चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी समीर सामंत आणि तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. मात्र फोंडाघाट मधील कामे ठेकेदार व ग्रामसेवक आणि संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या संगनमताने आणि प्रसंगी अरेरावी ने कशीही- निकृष्ट दर्जाची करून जनतेच्या पैशाचा अपव्य करीत आहेत.याची चर्चा फोंडाघाट पंचक्रोशीत होत आहे—-












