सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी  डॉ. किशोर कोचरेकर यांचे निधन

 

कुडाळ :डॉ. किशोर आवडोजी कोचरेकर (वय ६६),राहणार कोचरा तालुका वेंगुर्ले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ. किशोर कोचरेकर हे सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी होते. शनिवारी ३० मार्च रोजी रात्री ९.४५ वाजता राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

यांच्या पछात त्याची आई आउबाई कोचरेकर ,पत्नी स्नेहल, मुलगे अमोल आणि सिद्धार्थ, सुना आराध्या व सिद्धी, बहीण सीमा वेंगुर्लेकर,भावजी सुधाकर वेंगुर्लेकर , त्यांचे भाऊ सुनील ,सीताराम आणि अरुण आणि भाऊजय सुप्रिया , स्मिता व प्रविणा कोचरेकर तसेच नातवंडे मिताली व चिरायू असा मोठा परिवार आहे.

मुख्यमंत्री सडक योजनेच्या कुडाळ कार्यालयातील शाखा अभियंता अमोल कोचरेकर यांचे ते वडील होत.