दापोली हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री दालनाचा शुभारंभ

दापोली (प्रतिनिधी) महाराष्ट्राची भव्य परंपरा असलेल्या सोलापूर येथील पारंपरिक हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री दालनाचे दापोली शहरात श्री राधाकृष्ण मंदिर सभागृहात दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी दापोली नगरपंचायतीच्या आयएएस प्रोबेशनरी ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी चे दापोली शाखा संचालक किशोर नागरगोजे, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद रानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नगरपंचायत प्रशासकीय कार्यालयाच्या बाजूला शहरातील राधाकृष्ण मंदिर सभागृह येथे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. २१ एप्रिल २०२४ पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे दालन सुरू राहणार आहे.

 

 

सोलापुर येथील सुप्रसिध्द हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री भाऊराय हॅन्डलुम यांच्याकडून हे कापड दालन खास ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. सोलापुर सुप्रसिध्द,कॉटन साडी,धारवाड साडी, मदुराई सिल्क साडी,सेमी पैठणी साडी,खादी सिल्क,खादी कॉटन साडी,पिंटेड ड्रेस,वर्क ड्रेस,कॉटन परकर,टॉप पीस,सोलापूर चादर, बेडशीट, नॅपकिन, संतरंजी, पंचा, वुलन चादर,टॉवेल, दिवाणसेट,प्रिंटेड बेडशीट, शबनम बॅग, पिलो कव्हर, लुंगी, शर्ट,कुर्ता, बंडी, गाऊन, हॅन्डबॅग,लेडीज टॉप कापड कलाकुसर वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. या प्रदर्शन व विक्री झाल्यानंतर खास ग्राहकांसाठी 20% सवलत देण्यात आल्याची माहिती भाऊराय हॅण्डलूमचे पोतन यांनी दिली.