खेड ओमसाई ॲकॅडमी, चाटवची शुभ्रा कदम अव्वल

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील आंबवली-देऊळवाडी येथील श्री झोलाई क्रीडा मंडळाच्या वतीने श्री झोलाई मातेच्या शिमगोत्सवानिमित्त आयोजित नृत्य स्पर्धेत मोठा गटात खेडच्या ओमसाई ॲकॅडमी, तर लहान गटात चाटवच्या शुभ्रा कदमने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. मोठ्या गटात ओमसाई ॲकॅडमी द्वितीय तर आवाशीच्या रूही डान्स ॲकॅडमीने तृतीय क्रमांक मिळवला. आंबवली न्यू इंग्लिश स्कूल, आंबवली जि.प. शाळा यांना तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यास ३३३३ रूपये, उपविजेत्यास २२२२ रूपये तर तृतीय क्रमांकास ११११ रूपये व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. लहान गटात आवाशीच्या रूही डॉन्स ॲकॅडमीने द्वितीय, तर आंबवली न्यू इंग्लिश स्कूलच्या लतिका उतेकरने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यास ३३३३ रूपये, उपविजेत्यास २२२२ रूपये, तर तृतीय क्रमांकास ११११ रूपये व चषक देवून गौरवण्यात आले. परीक्षक म्हणून अभिजीत साळुंखे,  कृष्णा यादव, पुणेतील महेंद्र यादव, महाडिक, विष्णू यादव यांनी काम पाहिले.यावेळी आंबवली जिल्हा परिषद  शाळेचे मुख्याध्यापक खांडेकर, रूही डान्स ॲकॅडमीचे राठोड, ओमसाई ॲकॅडमीचे मोरे, भोसले यांना मंडळातर्फे सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दीपक यादव, अनिल यादव, महेंद्र यादव, सुरेंद्र यादव प्रभाकर यादव, पोलीस पाटील संदीप यादव, अध्यक्ष अनंत पवार, संजय यादव, रमेश यादव, सुनील यादव आदींनी  प्रयत्न केले.