खेड(प्रतिनिधी)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कोकण प्रदेश युवक अध्यक्ष पदी सुशांत भाई सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती ती नियुक्ती कायमस्वरूपी करून जिल्हातील युवक पदाधिकारी यांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे
मंडणगड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे रिपाईचे राज्य कार्यकारणी सदस्य दादा मेचेंडे यांच्या नेतृत्व खाली तसेच जिल्हा अध्यक्ष प्रीतम रूके यांच्या अध्यक्ष ते खाली झालेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ विजय मोरे व राज्य कार्यकारणी सदस्य सुमित मोरे डॉ प्रकाश राव शेंडगे राज्य कार्यकारणी सदस्य तसेच रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रितम रुके सुमित मोरे दादा मर्चेंडे यांच्या हस्ते सकपाळ यांचे अभिनंदन करून शुभेच्छ देण्यात आल्या.
या बैठकीसाठी कोकण नेते सुदास मोरे महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चेंडे खेड तालुका अध्यक्ष संतोष कापसे चिपळूण तालुका सरचिटणीस उमेश सकपाळ गुहागर अध्यक्ष संदिप कदम युवक आघाडी अध्यक्ष विकास धोत्रे तुषार कांबळे रायगड जिल्हा युवक सरचिटणीस सुशिल गायकवाड रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य सुमित मोरे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले मार्गक्रमण करत आहे. युवकांना फक्त खांद्यावर झेंडे घेण्यापुरते मर्यादीत न ठेवता रिपाईमध्ये त्यांना सन्मानाची वागणुक देऊन विविध पदाच्या माध्यमातून संधी दिली जात आहे. कोकणात उत्तम प्रकारे पक्षाचे संघटन सुरु असून, महाड येथे येत्या ऑगस्ट महिन्यात राज्यव्यापी युवक कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आयोजित करून कोकणात आपली ताकद दिसून येईल. भविष्यातील स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन युवा कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे त्यांनी सूचना केल्या.
नवनिर्वाचित युवक अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ यांनी पक्षातील ध्येय-धोरणानूसार कार्य करुन रिपाईच्या निळ्या झेंड्याखाली सर्व युवकांना संघटित करण्याचे कार्य केले जाणार असल्याचे सुशांत भाई सकपाळ यांनी सांगितले.











