भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले भव्य स्वागत
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी भाजप कार्यालयात भेट दिली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी हितगुज साधले.
याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, केतन आजगावकर, संतोष गांवस, प्रमोद गावडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











