Bank of Maharashtra tops NPL management in FY 2022-23
मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षा दरम्यान आपले अनुत्पादक कर्ज खात्यांचे प्रमाण (नेट एनपीए) 0.25% पर्यंत मर्यादित ठेवून बँक ऑफ महाराष्ट्रने अनुत्पादक कर्ज खात्यांच्या व्यवस्थापनामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार रुपये 3 लाख कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या बँकांच्या तुलनेत हे प्रमाण सगळ्यात कमी आहे.
वित्तीय वर्ष मार्च 2023 च्या अनुसूचित व्यापारी बँकांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कर्ज व्यवहारामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ने 29.49% वाढ साध्य करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
कमी व्याजदर असलेल्या चालू खाते आणि बचत खात्यांमध्ये (कासा) बँक ऑफ महाराष्ट्र ने 53.38% वाढ नोंदवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
ग्राहकांचा विश्वास आणि तत्पर ग्राहक सेवा यामुळेच हे यश संपादन केल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक श्री ए एस राजीव यांनी सांगितले.











