खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील फुुरुस गावातील फलसोंडा मधील चांदणी चौक येथील घराला अचानक आग, घर जळुन खाक, सुदैवाने जिवीत झाली नाही मात्र लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले ही आग शनिवारी १२ वाजण्याच्या सुमारास लागली
या आगीची माहिती मिळताच खेड न पा चा अग्निशामक दलाचा बंब कोकणी मुस्लिम संघाचा पाण्याचा टॅकर घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात यश आले फायरमन शाम देवळेकर, दिपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, प्रणव घागआदी पथकातील कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली दरम्यान लागलेली आग शॉर्ट सर्किट ने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून या आगीत मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे












