खेड(प्रतिनिधी) खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रघुवीर मानाई काळकाई क्रीडा मंडळ मोहाने या मंडळाच्यावतीने नुकतीच तालुकास्तरीय निमंत्रित पुरुष गट कबड्डी स्पर्धा मोहाने संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण बारा संघानी सहभाग घेतला.
स्पर्धेचे विजेतेपद श्रीकृष्ण फायटर भडगाव यांनी मिळवले. या संघाला रोख रुपये ५ हजार- व आकर्षक चषक तर उपविजेता ठरलेला झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली या संघाला ४ हजार व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. तृतीय क्रमांकाचा मानकरी काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे हा संघ ठरला या संघास रोख रुपये ३ हजार व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांक प्राप्त अष्टविनायक क्रीडा मंडळ तिसंगी या संघास रोख २ हजार व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईबद्दल झोलाई युवा प्रतिष्ठानचा दीपेश यादव तर उत्कृष्ट पकड श्रीकृष्ण फायटर्स भडगावचा ओंकार पार्टे यांना वैयक्तिक चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेला स्पर्धा निरीक्षक श्री.सुजित फागे, पंचप्रमुख श्री. दाजी राजगुरू, प्रो कबड्डीचे पंच श्री विलास बेंद्रे, श्री पांडुरंग विटमल, श्री मधुकर शिंदे, श्री स्वप्निल बैकर, श्री गणेश सानप, श्री राजेश भागणे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेसाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री महेशराव भोसले, उपाध्यक्ष श्री. सुभाष आंबेडे, सहसचिव श्री.शरद भोसले, सल्लागार श्री. दिपक यादव, श्री.दिलीप कारेकर, कार्यकारणी सदस्य श्री.महेश मर्चंडे महिला सदस्या प्रतिनिधी सौ.तेजा बैकर, सौ.संपदा गुजराथी यांचे सहकार्य लाभले.








