लोकसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर, 20 एप्रिल रोजी छाननी

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना आज जाहीर करण्यात आली असून त्याचा तारीखवार कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे

नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी किंवा जीवन देसाई, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक १९ एप्रिल २०२४ (शुक्रवार) पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुटी वगळून) सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी, ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ यांचे कार्यालय, दाखल करता येईल

 

नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील;

 

नामनिर्देशनपत्रांची छाननी दिनांक २० एप्रिल २०२४ (शनिवार) रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येईल

 

उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला, वरील परिच्छेद (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिका-यास त्यांच्या कार्यालयात दिनांक २२ एप्रिल २०२४ (सोमवार) रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत देता येईल;

 

६) निवडणूक लढविली गेल्यास दिनांक ०७ मे २०२४ सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. (मंगळवार) रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत