जिल्हावासीय जनतेने दिलेल्या संधीमुळेच आता केंद्रीय मंत्री पदापर्यंतच्या नेतृत्वाचा इतिहास निर्माण केला – केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे
सिंधुनगरी l बाळ खडपकर :मला या जिल्ह्यातील जनतेने अनेक पदावर काम करण्याची संधी दिली. मला मिळालेल्या या पदांचा उपयोग जिल्हा वासियांसाठी मी केला. दिल्लीपर्यंत एक केंद्रीय मंत्री म्हणून सक्षम नेतृत्व कायम ठेवलं व या जिल्ह्याला, कोकणाला व महाराष्ट्राला एक राजकीय ताकद निर्माण करून दिली. देशाची सुरक्षितता, देशाची प्रगती, यासह देशातील गोरगरीब जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अनेक योजना व जगातील भारताची उंचावलेली प्रतिमा कायम ठेवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करा. असे आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ओरोस येतील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा ओरोस जिल्हा परिषद कार्यकर्ता संवाद मेळावा शुक्रवारी ईच्छापुर्ती गोविंद मंगल कार्यालयात संप्पन्न झाला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे, संदीप कुडतकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत,मंडळ अध्यक्ष दादा साईल, महिला मंडळ अध्यक्ष सुप्रियाताई वालावलकर, राजू राऊळ, सरपंच राजन, परशुराम परब, सौ आशा मुरमुरे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या भागाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आपला 57% खासदार फंड खर्च केला नाही. दहा टक्के कमिशन साठी हा निधी खर्च झाला नाही. उलट माझा खासदार फंड या भागासाठी मी शंभर टक्के खर्च केला. विमानतळ, सीवल्ड, प्रकल्प रिफायनरी प्रकल्प अशा अनेक विकासात्मक योजनांना खासदार राऊत व उद्धव ठाकरे यांनी सातत्याने विरोध केला. अनेक रोजगार निर्माण करणारे हे प्रकल्प शिवसेनेच्या या नेत्यांमुळे रेंगाळले. मी मंत्री मुख्यमंत्री आता केंद्रीय मंत्री अशी अनेक पदे भूषविताना या पदांचा वापर मी या भागातील जनतेसाठी केला. जिल्ह्यातील जाणारा चौपदरी महामार्ग मी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडे मागणी केला. आडाळी एमआयडीसी, सिंधू नगरी ओरस येथील 200 कोटी खर्चाचे प्रौद्योगिक केंद्र, 4000 कोटी खर्च होणारे रेडी येथील बंदराचा विकास हाती घेण्याचे काम ज्या ज्या वेळी संधी मिळाले त्या त्यावेळी केले. दोडामार्ग आडाळी एमआयडीसीमध्ये औषधांचे कारखाने सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 1000 एकर जमीन ठेवण्यात आली आहे. या जिल्ह्यात अनेक विकास कामे व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी तब्बल 54 योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने केले आहेत. विकासाचा हा आलेख आणखी उंचावत नेण्यासाठी आपली व देशाची प्रगती करण्यासाठी भाजपला मत द्या असे आवाहन ही नारायण राणे यांनी केले.
शरदचंद्र पवारांचे काम, उबाठा शिवसेना संपविणे
राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांचा भाजपाला विरोध नाही तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी त्यांचे काम सुरू आहे याकडेही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरेंकडे पाच खासदारांची संख्या आहे. तर भाजपाकडे 303 खासदारांचे संख्याबळ आहे. आता तर भाजपचा चारशे पार चा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. गेल्या पाचशे वर्षात प्रभू रामचंद्रांचे मंदीर झाले नाही ते त्यांनी केले. धर्मस्थळे देव देवतांची मंदिरे याबाबत भाजपने फार मोठे काम केले. या नेतृत्वाला तडीपार करण्याची भाषा उद्धव ठाकरेंना शोभणारी तर नाहीच त्यांच्या याच नीतीमुळे शिवसेनेची अधोगती झाली. उद्धव ठाकरेंनी या कोकणासाठी या जिल्ह्यासाठी काय दिले ते जाहीर करावे असे आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात केले.
सिंधू नगरी प्राधिकरण क्षेत्रासह ओरोस, रानबाबळी पडवे गावराई या भागातील विकास कामांसाठी भाजप सरकारच्या सत्तेत फार मोठा विकास निधी मिळाल्याचे आकडेवारी कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी जाहीर केले. खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले गेल्या दहा वर्षात त्यांनी या जिल्ह्यात काय काम केले ते सांगावे. आपला खासदार निधी ते 57% खर्च करू शकले नाहीत. ते या जिल्ह्यात विकास काय करणार? असा असा सवाल ही त्यांनी केला. राणेसाहेबांनी मात्र या जिल्ह्यात या कुडाळ मतदार संघात आपला भरीव निधी देऊन या भागातील अनेक विकासकामे मार्गी लावली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मोठा निधी उपलब्ध करून दिला म्हणूनच या भागातील जनतेची नारायण राणे यांना भक्कम साथ हवी भाजपला मत हव असे आवाहन निलेश राणे यांनी केले.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने जाज्वल देशभक्ती असलेला एक तपस्वी नेता आपल्या देशाचे नेतृत्व करीत आहे. विकसित भारत ही संकल्पना या देशात राबविली जात असून भारतीय जनता पक्षाने गोरगरीब जनतेसाठी चांगले काम केले आहे. म्हणूनच या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला साथ देण्याची गरज आहे. हा जिल्हा परिषद मतदार संघ ही सिंधू नगरी नवनगर प्राधिकरण क्षेत्रात या शहराचा विकास व लगतच्या पडवे रानबांबुळी ओरस गावच्या विकासासाठी विकास निधी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण, प्राधिकरण क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण सिंधुनगरी नगरपंचायतीच्या कामाचा पाठपुरावा यासह लगतच्या गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी व अधिकचा निधी देण्यासाठी भाजपच्या काळात ठोस प्रयत्न झाले. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळेल व त्यासाठी येथील जनता साथ देईल असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
भाजप नेते संदीप कुडतरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कर्तुत्व त्यांचे दातृत्व सांगत त्यांनी या जिल्ह्यात आपल्या नेतृत्वाने एक इतिहास निर्माण केला. राणे साहेब जिथून उभे राहतात तेथून राजकारण सुरुवात होते व राणे साहेब इतिहास घडवतात. लोकनेता कसा असावा हा आदर्श त्यांच्यामुळे या जिल्ह्यात पाहायला मिळाला. हा जिल्हा टँकर मुक्त जिल्हा झाला तो केवळ नारायण राणे यांच्यामुळेच. अनेक पद त्यांनी भूषविली व त्यानी आपल्या कारकितीचा इतिहास निर्माण केला. देशाच्या सत्तेमध्ये भाजपचे एक मोठे मंत्री असं एक हिमालया एवढ्या नेतृत्व या जिल्ह्याला नारायण राणे यांच्यामुळे मिळाले हे नेतृत्व कायम ठेवण्यासाठी राणे साहेबांना साथ द्या भाजपाला मत द्या असे आवाहनही त्यांनी केले.
आपले मंत्री व आपले मार्गदर्शक नारायण राणे यांचे प्रचारक व्हा व त्याचे संसदेतील नेतृत्व पुन्हा भरघोस मताधिक्याने पाठवा असे आवाहन भाजप महिला अध्यक्षा संद्या तेरेसे यांनी केले. सर्वांचे स्वागत मंडळ अध्यक्ष दादा साईल यांनी केले तर आभार सौ सुप्रियाताई वाल्हेकर यांनी मानले.












