इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशनमध्ये शौर्य मांजरेकरचे उज्वल यश 

 

मुंबई येथील रंगोत्सव सेलिब्रेशन या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशनमध्ये प्रिंसीपल एम आर देसाई प्रशालेचा इयत्ता चौथीमधील विद्यार्थी कुमार शौर्य शंकर मांजरेकर याने कार्टून मेकींग मध्ये उत्कृष्ट कला सादर करत इंटरनॅशनल मेडल व सर्टिफिकेट प्राप्त केले. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन मध्येही तो विनर झाला होता. त्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.