राजापूर (वार्ताहर): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविणेसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 267 राजापूर विधानसभा मतदार संघात जनजागृती कार्यक्रम (SVEEP) कार्यक्रम राबविणेत येत आहेत.
राजापूर तालुक्यात जनजागृती कार्यक्रम राबविणेसाठी राजापूर गट शिक्षण अधिकारी उत्तम भोसले, व लांजा गटशिक्षण अधिकारी विजयकुमार बंगडर राजापूर व लांजा, संगमेश्वर (साखरपा-27 केंद्र) तालुक्यामध्ये जनजागृती कार्यक्रम राबविणेसाठी प्रथक प्रमुख म्हणुन नियुक्ती करणेत आली आहे.
सदर पथकांमार्फत मतदारांमध्ये जनजागृतीचे मागदर्शन करणेत येत आहे. 267- राजापूर मतदार संघात मतदानाची टक्केवारीत वाढ होणेसाठी जनजागृती (SVEEP) कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार नियुक्त केलेल्या पथकांनी पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चुनाव पाठशाला, स्वाक्षरी मोहिम, प्रभातफेरी, दिव्यांग मेळावा, महिला मेळावा व रॅली या विविध माध्यमातुन मतदान जन जागृती मतदारांपर्यत पोहोचविणेचे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.
—-










